Menu Close

हिंसाचारामुळे धुलागड (बंगाल) अजूनही धुमसतेच !

  •  १०० हून अधिक घरे आणि दुकाने जाळल्याचा पीडित हिंदूंचा आरोप !

  •  घटनास्थळाचा दौरा करण्यापासून पोलिसांनी भाजपच्या शिष्टमंडळाला रोखले !

बंगालमधील हिंदू साम्यवादी विचारसरणीचे झाले. तेथे साम्यवाद्यांनी अनेक वर्षे राज्य केले. नक्षलवादाचा उगमही तेथेच झाला. हिंदू धर्म आणि साधना विसरल्यामुळे त्यांच्यावर सतत आक्रमणे होत आहेत. त्यावर एकच उपाय म्हणजे साधना करून ईश्‍वराची कृपा प्राप्त करणे. मग त्यांचे नेहमीच रक्षण होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात


धुलागड (हावडा, बंगाल) :
 बंगालमधील मालदानंतर आता धुलागड धार्मिक हिंसाचारामुळे धुमसत आहे. या हिंसाचारात २५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. तेथील तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वी हिंसाचारग्रस्त भागात जाण्यापासून पोलिसांनी भाजपच्या शिष्टमंडळाला रोखले होते. या दंगलीमध्ये धर्मांधांनी १०० हून अधिक घरे आणि दुकाने जाळली आहेत, असा आरोप पीडित हिंदूंनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. या हिंसाचारानंतर ५० लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलीस अधीक्षक सब्यसाची रमन मिश्रा यांनी सांगितले.

१. धुलागडच्या बानिजोपोला या गावात १३ डिसेंबर या दिवशी महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या घरांना आग लावली होती, तसेच त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंची लूटमार केली होती. या घटनेमुळे भयभीत झालेल्या येथील ६० हिंदु परिवारांनी पलायन केले होते.

२. तथापि त्या वेळी २ गटांत सामंजस्य घडवून आणल्याने हे प्रकरण सोडवण्यात आले होते. त्यानंतरही संतप्त जमावाने धुलागड येथील बॅनर्जी पाडा, दावनघाटा, नाथपाडा या ठिकाणी काही घरे आणि दुकाने यांची तोडफोड करून आग लावली. त्यामुळे परत दंगल भडकली. या संपूर्ण भागात अद्यापही दहशतीचे वातावरण आहे.

३. येथील एका व्यावसायिकांच्या पत्नीने सांगितले, ‘‘आमचे दुकान जाळण्यात आले, तसेच माझ्या पतीलाही बेदम मारहाण करण्यात आली. हे सर्व घडत असतांना पोलीस काही करू शकले नाहीत.’’

४. आक्रमण करणार्‍यांपैकी काही जण स्थानिक २ मदरशांमधील होते, तर काही जण जमात-ए-इस्लामी या संघटनेचे होते, असे सांगितले जाते.

५. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विविध ठिकाणी बॉम्बने आक्रमण करण्यात आले. मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्यात आला; मात्र या काळात कोणत्याही लोकप्रतिनिधीने धुलागडला भेट देण्यात स्वारस्य दाखवले नाही. (हे आहे राजकारण्यांचे खरे स्वरूप ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

जनतेला आधाराची आवश्यकता असतांना दायित्त्व झटकणारे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी !

१. पंचला येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार गुलशन मलिक म्हणाले, ‘‘हिंसाचारग्रस्त क्षेत्र माझे नसल्यामुळे मी त्याकडे लक्ष दिले नाही.’’

२. संकरेल येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार शीतल सरदार म्हणाले, ‘‘हा हिंसाचार अचानक उफाळला होता. आम्ही तेथे गेलो असतो, तर परिस्थिती अधिक चिघळली असती.’’ (हिंसाचारात जनता होरपळत असतांना त्यापासून दूर पळणारे लोकप्रतिनिधी देणारी लोकशाही निरर्थक ठरते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. हावडा सदर येथील तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनर्जी म्हणाले, ‘‘मी लोकसभेत नोटाबंदीला विरोध करण्यात व्यस्त होतो. त्यामुळे मी ज्येष्ठ नेते शीतल सरदार आणि पुलक रॉय यांना घटनास्थळाचा दौरा करणे आणि परिस्थिती नियंत्रित करण्यास सांगितले होते.’’ (स्वत:चे दायित्त्व दुसर्‍यांवर ढकलणारे लोकप्रतिनिधी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *