२६ डिसेंबर १५३० या दिवशी बाबरचा मृत्यू झाला. आज २६ डिसेंबर या दिवशी त्याचा मृत्यूदिन आहे. त्यानिमित्त त्याने केलेली काही पापकृत्ये पुढे देत आहोत.
१. (म्हणे) ‘बाबर न्यायप्रिय, धर्मनिरपेक्ष, उदार आणि सहृदयी बादशहा होता !’ – खुशवंत सिंह
‘काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये ‘मद्य (सुरा) आणि सुंदरी’ यांच्या सुंदरतेविषयी लिहिणारे खुशवंत सिंह यांचे बहुचर्चित ‘ना काहू से दोस्ती, ना काहू से वैर’ या स्तंभांतर्गत अयोध्येसंबंधी लेख वाचण्यात आला. यामध्ये बाबरने ११.१.१५२६ या दिवशी पुत्र हुमायूनला लिहिलेल्या पत्राचे वर्णन आहे. या पत्राच्या आधारावर लेखकाने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की, बाबर एक न्यायप्रिय, धर्मनिरपेक्ष, उदार आणि सहृदयी बादशहा होता. या पत्रावरून हेही दिसून येते की, बाबरने हुमायूनला कोणतेही धर्मक्षेत्र न तोडण्यास कडक शब्दांत सांगितले होते आणि सर्व धर्मांचा आदर करण्याचा सल्ला दिला होता.
२. गुरुनानक यांनी आक्रमक बाबरच्या आक्रमणांविषयी अत्यंत सजीव अन् मार्मिक चित्रण केले असणे
गुरुनानक यांनी त्यांच्या ‘सबद’मध्ये आक्रमक बाबरच्या आक्रमणांचे आणि त्याच्या सैन्याने केलेल्या कुकर्मांचे अत्यंत सजीव अन् मार्मिक चित्रण केले आहे. गुरुनानक यांनी ऐमनाबाद (सध्याचे पाकिस्तान) येथे बाबरच्या सेनेची कुकर्मे स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती.
३. श्रीराम मर्यादेचे प्रतीक होता, तर बाबर नरसंहाराचा, हे लक्षात घ्या !
श्रीराम मर्यादेचे प्रतीक होता, तर बाबर नरसंहाराचा ! श्रीरामाच्या नावासमवेत दया, क्षमा, सत्य आणि तप हे गुण आहेत, तर बाबरच्या नावात हत्या, अत्याचार, बलात्कार आणि व्यभिचार हे अवगुण आहेत. राम महान आहे, तर बाबर नराधम. अशा परिस्थितीत भारतवासियांनी कोणाला आदर्श मानायला हवे ? दिलिप, रघु, अज आणि दशरथाचा वंशज ‘राम’ आपल्याला अस्मिता प्रदान करील कि तैमूर अन् चेंगिजखानचा ‘प्रिय बाबर’, याचा निर्णय आपल्या अंतर्मनाला विचारून प्रत्येकाने स्वतःच घ्यावा.’
– भारत भक्ती उद्घोष यांच्या सौजन्याने (‘पाक्षिक पावन परिवार’, १ ते १५ एप्रिल २०११)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments