शासनाने या आतंकवाद्यांना भारताच्या कह्यात देण्यास पाकला भाग पाडावे ! – संपादक, हिंदुजागृती
इस्लामाबाद : पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात झाडाझडतीला सुरुवात झाली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड मौलाना मसूद अजहरला पाकिस्तानच्या बहावलपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. मौलाना मसूर अजहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे.
पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणी छापा टाकण्यात येत आहे. आतापर्यंत १२ संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.
अजहर मसूद हा तोच अतिरेकी आहे, ज्याला १९९९ मध्ये अपहरण झालेल्या विमानाच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या कंदहारमध्ये सोडण्यात आलं होतं.
पठाणकोट हवाईतळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये सॅटेलाईट फोनद्वारे वार्तालाप केला होता.
गुप्तचर यंत्रणांच्या सुत्रांनुसार, अजहर बहावलपूरमध्ये राहतो. तोच जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो.
जैश-ए-मोहम्मदविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर संघटनेच्या अनेक कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे. पाकिस्तान सरकार एक विशेष चौकशी पथ (SIT) पठाणकोटला पाठवणार आहे. ही टीम तपासात भारताला मदत करेल. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
संदर्भ : एबीपी माझा