Menu Close

रांची (झारखंड) येथे धर्मांधाकडून हिंदु मुलीची फसवणूक करून लग्न !

लव्ह जिहाद कुठे आहे ? असे हिंदूंना विचारणार्‍या लोकप्रतिनिधींचे डोळे आतातरी उघडतील का ?

love-jihad-hnरांची (झारखंड) – येथील शेख अली अफझल या धर्मांधाने स्वत: हिंदु असल्याचे भासवून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी लग्न केले. (लव्ह जिहादच्या संकटापासून वाचण्यासाठी हिंदु तरुणींनी धर्मांधांच्या बनावट फेसबूक खात्यापासून (अकाऊंटपासून) सावध रहावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. पीडित युवतीची फेसबूकवरून रौशन भारद्वाज याच्याशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर वर्ष २०१३च्या जानेवारीमध्ये तिने रौशनसमोर न्यायालयीन विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला.

२. न्यायालयात पीडितेला रौशनचे खरे नाव शेख अली अफझल असल्याचे समजले. तोपर्यंत पुष्कळ उशीर झाला होता.

३. अफझलने तिची अश्‍लील ध्वनीचित्रफीत पूर्वीच सिद्ध करून ठेवली होती. त्यामुळे न्यायालयीन विवाह झाल्यावर पीडिता शेख अलीसह सीवान येथील त्याच्या घरी गेली.

४. सीवान येथे नाव पालटण्यासाठी अफझल तिला शिवीगाळ करायचा आणि त्रासही द्यायचा. तिने न ऐकल्यास तिची अश्‍लील ध्वनीचित्रफीत संकेतस्थळावर अपलोड करण्याची धमकी द्यायचा.

५. त्यानंतर पीडिता वर्ष २०१४ मध्ये रांची येथे स्वतंत्रपणे राहू लागली. २२ डिसेंबरला अफझल त्याचा मित्र मौसीन खानसह तिच्याकडे आला. त्याने पीडितेला स्वत:सह येण्यास धमकावले; परंतु पीडितेने त्याच्यासह जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला मारहाण केली. तिच्या आवाजाने परिसरातील लोक धाऊन आले. त्यांनी दोन्ही धर्मांधांना चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *