Menu Close

४०० किलो गोमांस घेऊन जाणारा ट्रक बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडला !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे आणखी एक उदाहरण !

जे काम पोलिसांनी करायला हवे, ते हिंदुत्ववाद्यांना करावे लागत आहे !

ठाणे : नाशिकहून अवैधरित्या गोमांस भरून मुंबईला येण्यासाठी निघालेला टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पहाटे ५ च्या सुमारास ठाण्यातील खारेगाव टोलनाक्याजवळ पकडून पोलिसांच्या कह्यात दिला. या टेम्पोमधील ४०० किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे. गोमांस घेऊन जाणारा टेम्पो खारेगाव टोलनाक्याजवळून जाणार असल्याची माहिती बजरंग दलच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक मोहम्मद रईस कुरेशी याने भ्रमणभाष करून अन्य साथीदारांना साहाय्यासाठी बोलावले. लागलीच धर्मांधाचा जमाव टेम्पोचालकाच्या साहाय्यासाठी गोळा झाला. (अनभिज्ञ ठिकाणी केवळ एक भ्रमणभाष केल्यावर धर्मांधाचा जमाव एकत्र होतो; यावरून गोमांस नेण्याच्या मार्गावरील संभाव्य अडथळ्यांविषयी यांना अगोदरच पूर्वसूचना दिलेली असणार हे निश्‍चित. पोलीस या संघटित गुन्हेगारांचाही शोध घेणार आहेत, कि केवळ पकडलेल्या आरोपींना अटक करून थांबणार आहेत ?  संपादक, दैनिक सनातन प्रभात) बजरंग दलचे कार्यकर्ते आणि धर्मांध यांच्यामध्ये वादावादी झाल्यानंतर कार्यकर्त्यांना धमकावून धर्मांध पसार झाले. कार्यकर्त्यांनी चालकासह गोमांसाने भरलेला टेम्पो कळवा पोलिसांच्या स्वाधीन केला. चालकासह त्याचा साथीदार नौशाद इब्राहिम यास पोलिसांनी अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *