भाजप शासन एकीकडे मोठा गाजावाजा करून मुंबईत शिवछत्रपतींच्या स्मारकाची पायाभरणी करते आणि दुसरीकडे छत्रपतींची कर्मभूमी असलेल्या पुण्यनगरीत संस्कृती नासवणार्या सनबर्नला अनुमती देते, हे संतापजनक आहे. महाराष्ट्रातील तरुणांसमोर छत्रपतींचा आदर्श ठेवण्याच्या गोष्टी करतांना तरुणांचे अध:पतन करणार्या सनबर्नला अनुमती देणे हे केवळ भाजपचे नव्हे, तर देशाचे दुर्दैव आहे, असे मत सांगली येथील श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी व्यक्त केले.
श्री. चौगुले पुढे म्हणाले, हा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने कुणाशीही चर्चा केली नाही आणि एकतर्फी निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयाचा अर्थ असा होतो की, शासनाला कुणाचीही किंमत नाही. भाजपकडे नीतीमूल्य जपणारा पक्ष म्हणून पाहिले जाते. आता सनबर्नला अनुमती देतांना नीतीमूल्ये कुठे गेली ? शासन आज केवळ पर्यटन, महसूल अशा बाबींचा विचार करत आहे, तर मग या देशातील संस्कृतीचा कुणी विचार करायचा ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात