Menu Close

फरहान अख्तर समवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाणार्‍या अभिनेत्री श्रद्धा कपूरला शक्ती कपूर यांनी फरफटत नेले !

चित्रपटसृष्टीतील लव्ह जिहाद


मुंबई :
चित्रपटसृष्टीत खलनायकाची भूमिका करणारे कलाकार शक्ती कपूर यांनी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यासमवेत लिव्ह इन रिलेशनशिप रहाणार्‍या त्यांच्या मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला फरफटत घरी नेले. रॉक ऑन २ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर वडिलांचे घर सोडून अख्तरच्या घरी रहात होती.

विवाहित आणि दोन मुलांचा पिता असणार्‍या फरहानबरोबर स्वतःच्या मुलीचे प्रेमसंबंध शक्ती कपूर यांना मान्य नव्हते. त्यामुळे शक्ती कपूर आणि श्रद्धा हिची मावशी पद्मिनी कोल्हापुरे फरहान यांच्या घरी गेले. त्या वेळी शक्ती कपूर, फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर या तिघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. श्रद्धा सहजासहजी घरी जाण्यास सिद्ध नसल्यामुळे शक्ती कपूरने तिला फरफटत घरी नेले. दोघांच्या वयातही खूप अंतर असून दोघांची घनिष्ठ मैत्री पाहूनच अख्तर यांची पत्नी अधुना यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून ते वेगळे राहतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *