हिंदुत्ववाद्यांना प्रत्येक वर्षी अशी मागणी का करावी लागते ? प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची निर्मितीच होऊ नये, यासाठी शासन कठोर कायदा का नाही करत ?
हिंदु जनजागृति समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ
सातारा : येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी, निवासी नायब तहसीलदार श्री. बी.एल्. मोरे आणि पोलीस अधिकारी श्री. संजय सुर्वे यांना देण्यात आले. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची छुप्यारितीने विक्री करणार्या दुकानदारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
या वेळी अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, बजरंग दलाचे श्री. मुकुंदराव पंडित, विश्व हिंदु परिषदेचे श्री. जितेंद्र वाडकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मंगेश निकम, हेमंत सोनवणे, संदीप ढवळे, पंकज जगताप, शिवाजी दळवी, विलास कुलकर्णी, महेश गायकवाड उपस्थित होते.
प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके यांचा वापर टाळा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके रस्त्यावर पडल्याचे विदारक चित्र राष्ट्रप्रेमी नागरिकांना प्रतीवर्षी असह्यपणे पहावे लागते. अशाप्रकारे होणारी राष्ट्रीय प्रतीकांची विटंबना थांबवण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके यांचा वापर टाळावा. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा ! या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांनी केले.
पलूस – येथे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. रवींद्र खोत आणि रवींद्र कुंभार, तर हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवाजीराव बर्गे, सयाजीराव जमदाडे आणि भीमराव खोत उपस्थित होते. हेच निवेदन शिक्षणाधिकारी श्री. बी.एन्. जगधने यांनाही देण्यात आले.
जत – येथे प्रांताधिकारी अशोक पाटील, पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगळे, गटशिक्षणाधिकारी संजय जावीर, तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री इरगोंडा पाटील, महेश तंगडी श्री शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष श्री. संभाजीराव भोसले, तसेच सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी व्हॉटस् अॅप गटावरून सर्वांना संदेश पाठवण्याचे आश्वासन दिले.
तासगाव – येथे नायब तहसीलदार सुनील ढाले यांना, तसेच पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. अजिभित घुले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विलास पोळ, जगन्नाथ पोळ, गजानन खेराडकर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात