निफाड (जिल्हा नाशिक) – जिल्ह्यातील लालपाडी या ठिकाणी रणरागिणी शाखेच्या वतीने महिला शौर्य जागरण कार्यक्रम घेण्यात आला. याचा लाभ ६० महिला आणि मुली यांनी घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ उपसरपंच सौ. शकुंतला सानप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती वैशाली कातकाडे यांनी केले, तर कु. मोनिका गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लव्ह जिहादचे भीषण वास्तव सर्वांना समजावे याकरीता एक ध्वनीचित्रफीत या वेळी दाखवण्यात आली. तसेच प्रत्येकाला स्वत:चे रक्षण स्वत: करता यावे याकरिता स्वसंरक्षणाची काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.
क्षणचित्रे – कार्यक्रमाचा प्रसार आणि पूर्वसिद्धता गावांतील मुलांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन केली.