Menu Close

रतलाम (मध्यप्रदेश) येथील सरस्वती शिशू विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

स्वतःच्या संस्कृतीविषयी संभ्रमात असलेल्या पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण सोडा ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

रतलाम (मध्यप्रदेश) : आज हॅलो म्हणणे, शेकहॅन्ड करणे, फादर-मदर डे साजरे करणे, यांसारख्या अनेक छोट्या छोट्या कृतीतून कळत नकळत आपण अर्थहीन पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहोत. दुसरीकडे पाश्‍चात्त्यांना त्यांच्या संस्कृतीतील फोलपणा लक्षात आल्याने ते हिंदु संस्कृतीकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे आपण पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण सोडून अभिमानाने आपल्या संस्कृतीचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. येथील श्रीराम शिक्षण संस्थान संचालित सरस्वती शिशू विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सरस्वती शिशू मंदिराचे संचालक श्री. वीरेंद सकलेचा, अध्यक्ष श्री. ब्रजेशनंदन मेहता आणि अध्यापक श्री. महेश शर्मा उपस्थित होते.

पू. डॉ. पिंगळे पुढे म्हणाले की, तंत्रशास्त्रात एखाद्याला त्रास देण्यासाठी त्याच्या नावे बाहुली करून ती कापली जाते. आज तर आपण विदेशी लोकांचे अंधानुकरण करतांना स्वतःचे नाव केकवर लिहून, ते आपणच कापतो, हे कितपत योग्य आहे ? जन्मदिन तिथीनुसार साजरा करा. आपल्या सर्व देवांचे उत्सव तिथीला असतात; मग आपण आपला दिवस इंग्रजी कॅलेंडरनुसार का करावा ? दिवा विझवणे, हे आपण अशुभ मानतो. आपल्याकडे दीपप्रज्वलन करुन प्रकाशाकडे जाण्याची परंपरा आहे. मग आपल्या शुभदिनी आपण मेणबत्त्या विझवून अंधार करणे योग्य आहे का ?, याचा विचार सर्वांनी करावा.

आपण सर्व ज्ञान देणार्‍या देवी सरस्वतीचे आजीवन शिशू (विद्यार्थी) असतो !

या वेळी पू. डॉ. पिंगळे म्हणाले, या शिशू विद्या मंदिराचे नाव केवळ सरस्वती आहे, असा विचार करू नका. सरस्वती शिशू अर्थात सरस्वतीचे पूत्र ! सरस्वती ही ज्ञानदेवता आहे. जो सदैव शिकत रहातो, तोच जीवनात उन्नती करू शकतो. त्यामुळे आपण सर्वजण आजीवन या सरस्वती देवीच्या विद्यालयाचे विद्यार्थी आहोत.

क्षणचित्रे

१. येथे सनातन धर्मसभा या संघटनेच्या वतीने आयोजित व्याख्यानासाठी पू. डॉ. पिंगळे रतलाम येथे आले होते. या कार्यक्रमाला सरस्वती शिशू मंदिराचे अध्यक्ष श्री. मेहता उपस्थित होते. त्यांनी पू. डॉ. पिंगळे यांना लगेच शाळेत आमंत्रित केले.

२. या कार्यक्रमाचा ४ थी ते १० वीच्या ३०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *