नवी देहली – आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन संस्थेविरोधात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) झाकीर नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.
यापूर्वी स्वंयसेवी संस्थांना थेट विदेशी निधी मिळत होता. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विदेशी निधी घेण्यापूर्वी परवानगीची अट घातली होती. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला विदेशातून मिळणाऱ्या निधीच्या चौकशीचेही आदेश दिले होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून गेल्या महिन्यात इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या झाकीर नाईक याच्या संस्थेवर छापे टाकण्यात आले होते. त्याआधी एनआयएने धार्मिक द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर कृत्यांप्रकरणी झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच एनआयएकडून संस्थेच्या कार्यालयांची झाडाझडती घेण्यात आली होती.
संदर्भ : लोकसत्ता