सरकारने स्वतःहून मद्यबंदी करणे अपेक्षित होते. अशी मागणी करावी लागते, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
पुणे : येथील केसनंद गावामध्ये सध्या सनबर्न फेस्टिव्हल चालू असून त्यामध्ये मद्यप्राशन करण्याची अनुमती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. केसनंद या गावापासून धार्मिक क्षेत्रे जवळच असल्याने गावामध्ये वर्ष २००७ पासून मद्यबंदी केली आहे. त्या दृष्टीने केसनंदच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत तसा ठरावही संमत केला आहे. असे असतांना सनबर्न फेस्टिव्हलमध्ये येणार्या लोकांना मद्यप्राशन करण्यासाठीची अनुमती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. यामुळे गावाचे पावित्र्य भंग होणार असून विभागाने दिलेला मद्यपरवाना तात्काळ रहित करावा, अशी मागणी करणारे निवेदन माहिती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांनी विभागाचे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांना २९ डिसेंबर या दिवशी दिले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हेही उपस्थित होते. या वेळी श्री. वर्दे यांनी आम्ही हा परवाना कायद्याच्या चौकटीतच दिला आहे, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात