Menu Close

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे व्यसनाधीन बनलेला मानव !

daru_c‘पाश्‍चात्त्य संस्कृतीचा अवलंब केल्यामुळे मानवी जीवन व्यसनाधीन होत आहे. मनुष्याचे आयुष्यमानही अल्प होत आहे. या व्यसनाधीनतेमुळे होणारे परिणाम आणि जाणवणारी लक्षणे यांविषयीची ‘मासिक वज्रधारी’मध्ये प्रसिद्ध झालेली माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

१. व्यसनाचे दुष्परिणाम स्वतःसह कुटुंब आणि समाज यांना भोगावे लागणे 

कोणत्याही व्यसनाचे दुष्पपरिणाम दोन प्रकारचे असतात.

१. तात्कालिक आणि २. दीर्घकालीन

तात्कालिक परिणाम हे व्यसनाच्या प्रारंभापासून दिसून येतात; पण व्यसनी पदार्थ सवयीचा झाल्यानंतर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून येतात. त्यात व्यसनी व्यक्तीचे शरीर, मन, कुटुंब, समाज आणि मुले, हे सारेच भाजून निघतात.

२. व्यसनी व्यक्तीची मानसिक लक्षणे !

व्यसनी व्यक्तीचे मन प्रारंभापासूनच बलहीन असते. त्यामुळेच समस्येवर विधायक मार्ग शोधून उपाय करण्यापेक्षा त्यांनी व्यसनाची निवड केलेली असते. यामुळे व्यसनाधीन झाल्यावर मानसिक लक्षणे प्रकर्षाने दिसू लागतात.

अ. व्यसनाची प्रकर्षाने ओढ वाटू लागते.

आ. अनियंत्रित व्यसन केले जाते.

इ. केेेवळ व्यसनाचाच विचार केला जातो.

ई. वाईट परिणाम दिसत असूनही व्यसन चालू ठेवले जाते.

उ. ‘आपण व्यसनी आहोत’, ही वस्तूस्थितीच नाकारली जाते.

या नकारात्मक भावनांमुळे मनुष्य अधिकच व्यसनी होतो आणि त्यातून मुक्त होण्याची त्याची इच्छाच संपते. त्यानंतर आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होतात.

३. शारीरिक समस्या !

शरिरांतर्गत अवयवांवर व्यसनाचा दूरगामी परिणाम झालेला असतो. त्यामुळे विविध आजार निर्माण होऊ लागतात. व्यसनामुळे शरीर पोखरले गेलेले असते. रोगप्रतिकारक शक्त्ती अल्प झालेली असते. व्याधींना तोंड देणे अवघड होऊन बसते. जठर, अन्ननलिका, मुख, यकृत आणि अंत्र यांचे रोग उत्पन्न होतात.

४. मानसिक समस्या !

नैराश्य, अतीचिंता, समवेतच्या लोकांत मिसळता न येणे, सतत एक गोष्ट करण्याची प्रवृत्ती, अपराधीपणाची भावना, मेंदूवरील नियंत्रणाचा आणि शरीर मनाच्या सुसुत्रतेचा अभाव, चित्त एकाग्र न होणे, सतत व्यसनाचे विचार, विचारशक्तीचा अभाव, स्मृती-चिंतन क्षमता अल्प होणे, अतीसंवेदनशीलता किंवा असंवेदनशीलता निर्माण होणे, निद्राविकार, तणावाच्या व्यवस्थापनेचा अभाव, ‘झटका’ येणे, पाहिलेल्या किंवा न पाहिलेल्या काल्पनिक गोष्टींची भीती, स्वतःकडून आणि इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणे आणि अकार्यक्षमता इत्यादी.

५. सामाजिक समस्या !

व्यसनी व्यक्ती आणि तिचे कुटुंंब समाजातील स्थान, आदर गमावते. त्यामुळे सामाजिक संपर्क नकोसा, एकटेपणा, तुटलेपणा अधिकच ताण निर्माण करतो. व्यसनी व्यक्तीच्या कुटुंंबियांना समाजाच्या सहानुभुतीचे धनी व्हावे लागते.

६. शरिरावर होणारे परिणाम !

अपघातांचे प्रमाण वाढते, व्यसन न केल्यास थरथर कापणे, पुष्कळ घाम येणे, नाडीचे ठोके वाढणे, अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे केवळ जिवंत रहाण्यासाठीही व्यसन आवश्यक वाटू लागते. या लक्षणांनाच ‘विड्रोल्स’ किंवा व्यसनावलंबित्व दाखवणारी लक्षणे म्हणतात.

७. मनावर होणारे परिणाम !

अ. व्यसनी व्यक्ती समाज, मित्र, कुटुंबीय यांच्यापासून दूर जाते.

आ. मनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे अनिर्बंध प्रतिक्रिया देणे चालू होते.

इ. कुठल्याही गोष्टीत आनंद घेण्याच्या प्रवृत्तीचा र्‍हास होतो.

ई. जगणे नकोसे होते.

उ. निद्रानाश, अतीचिंता, अचानक आक्रमण केल्यासारखी प्रतिक्रिया देणे

ऊ. आत्महत्येचे विचार प्रबळ होणे

सामान्य माणसांना या लक्षणातून बरे होणे, हे तुलनेने सोपे असते. व्यसनी माणसाच्या मेंदूची ताणतणाव सहन करण्याची एकंदर क्षमताच खालावलेली असल्याने त्यांना या गर्तेतून बाहेर काढणे कठीण होते.

८. व्यसनी व्यक्तीला होणारे आजार !

दुर्बलता, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे निर्माण होणार्‍या व्याधी, मुखापासून शरिराच्या आतपर्यंतचे निरनिराळे कॅन्सर, यकृत विकार, दृष्टीदोष आणि कुपोषण इत्यादी.’

(संदर्भ : ‘मासिक वज्रधारी’, ९.७.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *