Menu Close

धर्मग्लानीच्या लढ्यात धर्माच्या बाजूने उभे रहाण्यासाठी उपासनेची आवश्यकता ! – योगेश व्हनमारे, हिंदु जनजागृती समिती

भोपाळ येथे धर्मरक्षण संघटनेच्या वतीने द्वितीय हिंदु अधिवेशनाचे आयोजन !

img-20161227-wa0011
द्वितीय हिंदु अधिवेशनात सहभागी झालेले धर्माभिमानी आणि मान्यवर

भोपाळ (मध्यप्रदेश) : धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्‍चर्या काय करणार ? भगवंताचे धर्मसंस्थापनेचे कार्य चालू आहे. हे समजून केवळ भावनात्मक कार्य न करता, एक तपश्‍चर्या म्हणून धर्मकार्य म्हणून समर्पण भावाने कार्य करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे ‘हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा’, असा भाव ठेवल्यास यश नक्कीच मिळेल. रावणाच्या विरोधात युद्ध करणार्‍यापूर्वी साक्षात प्रभु श्रीरामचंद्रांनाही उपासना करायला लागली, त्याप्रमाणे आपल्यालाही धर्माच्या बाजूने रहाण्यासाठी उपासना करायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी केले. धर्मरक्षक संघटनेच्या वतीने येथे द्वितीय हिंदु अधिवेशन २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनासाठी ४० धर्माभिमानी युवक उपस्थित होते. विविध मान्यवरांचे उद्बोधन, व्यायाम आणि योगासन यांचा या अधिवेशनात समावेश होता. हे अधिवेशन होण्यासाठी धर्मरक्षक संघटनेचे श्री. विनोद यादव यांनी पुढाकार घेतला होता. (हिंदूंच्या संघटनासाठी अशा प्रकारे अधिवेशनाचे आयोजन करून प्रभावी कार्य करणारी धर्मरक्षक संघटना आणि तिचे अध्यक्ष श्री. विनोद यादव यांचे अभिनंदन ! श्री. विनोद यादव यांचा हा प्रयत्न स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे न्यायचा आहे ! – मनोज उपाध्याय, धर्मजागरण प्रमुख, भोपाळ

पाकिस्तान हा भारताचाच भाग होता. जेव्हा मुसलमानांची संख्या २१ टक्के झाली, तेव्हा भारताची फाळणी होऊन पाकिस्तान झाला. आताही भारत पुन्हा फाळणीच्या दिशेने जात आहे; आपला हा काळा इतिहास पुन्हा होऊ द्यायचा नाही. पूर्वी धर्मांधांची बाजू घेणारे एकच गांधी होते, आता शेकडो निधर्मीवादी त्यांची बाजू घेत आहेत. आपल्याला आता गांधींचा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे न्यायचा आहे.

धर्माच्या आचरणाविना चांगले संघटन अशक्य ! – श्री. योगेश परमार, भाजप कार्यकर्ता

संघटनासाठी धर्माचे आचरण केले पाहिजे; मात्र तत्पूर्वी ‘धर्म म्हणजे ईश्‍वर’ हे समजून घेतले पाहिजे. ईश्‍वराचे गुण आपल्यात आणले पाहिजेत. तंत्र, मंत्र आणि यंत्र या तिन्ही गोष्टी संघटनासाठी तंत्र म्हणजे व्यवस्था-अनुशासन, मंत्र म्हणजे ध्येय्य आणि यंत्र म्हणजे समर्पित कार्यकर्ता, या ३ गोष्टी असल्यास संघटन उभे रहाते. धर्माचे आचरण करणारा चांगले संघटन उभे करू शकतो.

आक्रमकांशी लढणार्‍यांचा इतिहास पुढे येण्याची आवश्यकता ! – श्री. निमिष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

भारतावर झालेल्या आक्रमणाचा इतिहास सांगितला जातो; पण प्रत्येक आक्रमकाला पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, बाप्पा रावल यांच्यासारख्या पराक्रमी राजांनी धूळ चारली; पण हे आपल्याला शिकवले जात नाही. आक्रमकांचे राज्य केवळ  देहलीतच राहिले; बाकी उरलेल्या भारतात हिंदु राजांचेच राज्य होते. आज हे आदर्श आपण तरुणांसमोर ठेवून त्यांच्याप्रमाणे आचरण केले पाहिजे.

क्षणचित्र : अधिवेशनस्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वक्त्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यांच्या वक्तव्यात हिंदु राष्ट्राच्या आवश्यकतेचा उल्लेख केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *