वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ! सद्यस्थिती पहाता हा आधारस्तंभ खिळखिळा झालेला दिसतो. याला कारण हे की, सत्य आणि परखड वास्तव समाजापर्यंत पोचवून समाजमनाला जागृत करणे राहिले बाजूलाच, अर्थपूर्ण व्यवहार अन् काहींची मर्जी सांभाळण्यात धन्यता मानणार्यांचा या क्षेत्रात अधिक शिरकाव झाल्याचे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रकार्य आणि धर्मकार्य यांविषयीच्या वृत्तांना बगल दिली जाते. जळगाव येथील वृत्तपत्रे मात्र याला अपवाद आहेत. येथे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात येते. यंदाही २५ डिसेंबर या दिवशी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अनुषंगाने स्थानिक वृत्तपत्रांनी वेळोवेळी चांगली प्रसिद्धी देऊन तळागाळातील हिंदूंपर्यंत हे धर्मजागृतीचे कार्य पोचवण्यात मोलाची कामगिरी बजावली. या वृत्तपत्रांनी दिलेल्या प्रसिद्धीविषयी येथे माहिती देत आहोत.
हिंदु धर्मजागृती सभेला जळगाव जिल्ह्यात अन्य वृत्तपत्रांकडून मिळालेली प्रसिद्धी !
धर्मजागृती सभेनिमित्त २० नोव्हेंबर यादिवशी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या पहिल्या बैठकीला चांगली प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे : दिव्य मराठी, पुण्यनगरी, देशदूत, साईमत (सायंदैनिक), भास्कर (हिंदी), सामना, देशोन्नती, लोकमत
धर्मसभेनिमित्त प्रचाराचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात समिती आणि धर्मप्रेमींच्या साहाय्याने झालेल्या बैठकांविषयीच्या वृत्ताला चांगली प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे : गांवकरी, साईमत (सायंदैनिक), सत्यमय, देशोन्नती, भास्कर (हिंदी), लोकमत, दिव्यमराठी
समितीच्या वतीने धर्मजागृती सभेनिमित्त २० डिसेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वृत्ताला चांगली प्रसिद्धी दिलेली वृत्तपत्रे : भास्कर (हिंदी), आपला गुजरात, सामना, सकाळ, तरुणभारत, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती, दिव्य मराठी, लोकमत, गांवकरी, साईमत, सत्यमय, बातमीदार, जनशक्ती.
याबरोबरच युवा महाराष्ट्र आणि ईबीएम् या दोन स्थानिक वृत्तवाहिन्यांनी वाहनफेरी, तसेच पत्रकार परिषदेसंबंधीचे वृत्तांकन ५ मिनिटे दाखवले.
दिनांक २२ डिसेंबर या दिवशी झालेल्या भव्य वाहनफेरीला चांगली प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे : देशदूत, लोकमत, दिव्य मराठी, देशोन्नती, सामना, तरुणभारत, सकाळ, गांवकरी, पुण्यनगरी, भास्कर, महाराष्ट्र टाईम्स, साईमत, सत्यमय, जनशक्ती.
धर्मसभेचा उत्साह शिगेला अशी बातमी २४ डिसेंबरला जनशक्ती आणि गांवकरी २ दैनिकांनी लावली. धर्मसभेच्या म्हणजे २५ डिसेंबर या दिवशी आजचे कार्यक्रम या सदरात सभेचे स्थळ आणि वेळ देणारी आघाडीची ७ वृत्तपत्रे : लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी, सकाळ, देशदूत, देशोन्नती, महाराष्ट्र टाइम्स.
२५ डिसेंबर या दिवशी झालेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेच्या वृत्ताला चांगली प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे : (या सर्वच वृत्तपत्रांनी अर्ध्या पानाहून अधिक वृत्त तसेच ३ ते ५ छायाचित्रे छापून धर्मसभेच्या वृत्ताला चांगली प्रसिद्धी दिली.) लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी, देशदूत, सकाळ, तरुणभारत, महाराष्ट्र टाइम्स, जनशक्ती, साईमत, सामना, लोकशाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात