कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे यांना देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीची ध्वनीचित्रचकती त्यांना या वेळी दाखवण्यात आली. ही ध्वनीचित्रचकती पाहून श्री. बर्गे यांनी जिल्ह्यातील चित्रपटगृहात राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना श्री. बर्गे म्हणाले की, राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही शासनाचे कार्य करत आहात. सदरचे निवेदन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पाठवून देतो. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना निवेदन पाठवून द्यावे. सदरचे निवेदन देतांना हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, मधुकर नाझरे, किरण दुसे, प्रथमेश गावडे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात