चीनमधील ख्रिश्चन नागरिकांनी स्वतंत्र मार्ग निवडावा आणि आपल्या धर्माचे पालन करावे, असा सल्ला तेथील कम्युनिस्ट पार्टीने त्या देशातील ख्रिश्चनांना दिला आहे.
ख्रिश्चन धर्मियांचे नियंत्रण व्हॅटिकन येथून होते. त्यांच्यापासून वेगळे होण्याकरिता हा सल्ला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने दिला आला आहे, असे मानण्यात येत आहे. आपल्या देशातील ख्रिश्चनांच्या अंतर्गत व्यवहारांत व्हॅटिकनने दखल देऊ नये, अशी चीनची इच्छा आहे.
चीनच्या कॅथोलिक ख्रिश्चनांच्या धर्मगुरूंची निवड, हा चीन व व्हॅटिकनदरम्यान संघर्षास कारण ठरली आहे. हा अधिकार व्हॅटिकनकडे नसावा, असे चीनचे म्हणणे आहे. देशातील ख्रिश्चनांनी कम्युनिस्ट समाजाचा भाग बनावे आणि आपल्या धार्मिक व्यवहारांचे नियंत्रण व्हॅटिकनकडे देऊ नये, अशीही चीनची इच्छा आहे.
चीनमध्ये सध्या तीन प्रकारचे चर्च आहेत. देशातील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे ७.५ कोटी सदस्य आहेत, तर चर्चचे सदस्य १० कोटी आहेत. वर्ष २०३० पर्यंत चीनमधील ख्रिश्चन नागरिकांची संख्या २५ कोटी असेल, अशा अंदाज आहे.
यामुळे ख्रिश्चनपंथीय आणि कम्युनिस्ट सत्ताधाऱ्यांमध्ये तेथे संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात चीनच्या शँगडॉन्ग प्रांताच्या चर्च ऑफ ऑलमायटी गॉड नावाच्या पंथातील दोन कार्यकर्त्यांना फाशी देण्यात आली होती. र्झॅग लिडाँग आणि त्याची मुली झँग फॅन अशी त्यांनी नावे आहेत.
संदर्भ : माझा पेपर