बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंदूंना ठार करण्यात येत असतांना त्यांच्यासाठी काहीही न करणारे भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् त्यांचे वाचाळवीर नेते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका (बांगलादेश) – वर्ष २०१६ मध्ये बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या आक्रमणात ९८ हिंदूंची हत्या करण्यात आली, तर ३५७ जण घायाळ झाले आहेत, असे बांगलादेश जातीय हिंदु मोहजोटे (बीजेएच्एम्) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
१. बीजेएच्एम् चे अध्यक्ष सुक्रुती मंडल यांनी ढाका येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झालेली वृत्ते आणि हिंदु समुदायाकडून मिळालेली माहिती यांच्या आधारे हा अहवाल सिद्ध करण्यात आला आहे.
२. या अहवालानुसार मंदिरांतील देवतांच्या २०९ मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तर २२ मूर्तीं चोरीला गेल्या.
३. २२ हिंदू बेपत्ता झाले आहेत, तसेच ३८ जणांचे अपहरण झाले आहे.
४. बांगलादेशातील ७११ हिंदू देश सोडून गेले किंवा त्यांना देश सोडून जाण्याची चेतावणी दिली.
५. युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेशने दिलेल्या माहितीनुसार १ सहस्र १०९ हिंदूंना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत आणि १८ जणांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे वृत्त ढाका ट्रिब्युनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात