नववर्षाच्या पूर्वसंध्येला धर्मांध विस्थापितांनी केलेल्या जर्मन महिलांवरील अमानुष लैंगिक अत्याचाराचा प्रतिशोध !
बर्लिन : येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तसेच कार्यक्रमानंतर घरी परतणार्या जर्मन महिलांवर विस्थापित म्हणून आलेल्या धर्मांधांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. जर्मन पोलिसांनी या घटनांचे अन्वेषण चालू कले असले, तरी जर्मनीतील संतप्त नागरिकांनी मात्र अनेक गट स्थापन करून या विस्थापितांना शोधून त्यांना मारहाण करण्यास आरंभ केला आहे. जर्मन महिलांवर केलेल्या अत्याचाराचा हा प्रतिशोध असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला जर्मनीतील कोलोन, हॅमबर्ग आणि अन्य शहरांमध्ये जर्मन महिलांवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. अशा प्रकारच्या ६०० हून अधिक तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत. या घटनांनंतर जगात सर्वत्र धर्मांध विस्थापितांच्या या राक्षसी कृत्याचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर जर्मन नागरिकांमध्ये मात्र प्रचंड रोष आहे. जर्मन नागरिकांनी आता विविध गट स्थापन करून या विस्थापितांचे शोधसत्र आरंभले असून सापडेल त्या विस्थापिताला मारहाण करण्यास चालू केले आहे. त्यामुळे जर्मन प्रशासनावरील ताणात भर पडली आहे. (भारतातही बांगलादेशमधून आलेल्या धर्मांध घुसखोरांचा प्रश्न चिघळत चालला आहे. शासन आणि प्रशासन यांनी हा प्रश्न सोडवण्यास ठोस पावले न उचलल्यास पुढे जनतेनेच अशा घुसखोरांना धडा शिकवल्यास नवल ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
एकीकडे जर्मनीतील नागरिक धर्मांध विस्थापितांचा प्रतिशोध घेत असतांना दुसरीकडे जर्मनचे राज्यकर्ते मात्र अजूनही विस्थापितांसदर्भातील त्यांचे धोरण पालटण्यास पाठीपुढे पहात आहेत. त्यांनी तर या घटनांना अवास्तव महत्त्व दिले जात आहे, असा आरोपच केला आहे. आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या जाचातून सुटका होण्याच्या उद्देशाने वर्ष २०१५ मध्ये सिरिया, इराक अशा देशांतून लक्षावधी मुसलमानांनी युरोपातील देशांमध्ये स्थलांतर केले. युरोपातील काही देशांनी कठोर भूमिका घेत या विस्थापितांना देशात येण्यास मज्जाव केला. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी मात्र देशातील नागरिकांच्या विरोधाला न जुमानता विस्थापितांसाठी देशाचे द्वार उघडे ठेवले. त्यामुळे वर्ष २०१५मध्ये १० लक्ष विस्थापितांनी जर्मनीत आश्रय घेतला. आता मात्र त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. स्थानिकांना त्रास देण्यासह हे विस्थापित चोर्यामार्याही करू लागले आहेत. त्यामुळे जर्मनीतील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत ढासळली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात