नवी देहली – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयूच्या) संस्कृत विभागाचे प्रमुख डॉ. गिरिशनाथ झा यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी पू. डॉ. पिंगळे यांनी डॉ. झा यांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या स्थापनेचा उद्देश सांगितला आणि त्याविषयी ध्वनीचित्रफित दाखवली. याप्रसंगी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. प्रणव मणेरीकर आणि सौ. क्षिप्रा जुवेकर हेेही उपस्थित होते.
डॉ. झा यांनी १८ डिसेंबर या दिवशी ‘जेएनयू’मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधकांना शोधकार्य सादर करण्याची संधी दिली होती.
या वेळी डॉ. झा म्हणाले, ‘‘जेएनयू’मध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून संस्कृतला विरोध होतो. त्यांच्या मते ‘संस्कृत भाषा ही उच्चभ्रू लोकांसाठी असून ती विकासविरोधी आहे. शुद्र आणि महिला यांना वेदांचे पठण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.’ आमच्या विद्यापिठातील संस्कृत विभागाची इमारत स्वस्तिक आकाराची असल्याने तिलाही डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून विरोध केला जातो. अशा प्रकारच्या अपप्रचारांचा प्रतिवाद करू शकणार्या विद्वान लोकांची आम्हाला आवश्यकता आहे. यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करू.’’
क्षणचित्रे
१. डॉ. गिरिशनाथ झा यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले.
२. त्यांनी गोवा येथील सनातन आश्रमात येण्याची इच्छा प्रदर्शित केली.
३. पू. डॉ. पिंगळे यांनी डॉ. झा यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०१७’ भेट दिले.
४. पू. डॉ. पिंगळे यांनी डॉ. झा यांना एप्रिलमध्ये गोव्यात होणार्या संस्कृत संमेलनाची माहिती दिली.
५. डॉ. झा प्रमुखपदावर असतांनाही नम्र आहेत. पू. डॉ. पिंगळे यांच्या भेटीच्या वेळी डॉ. झा यांना येण्यास विलंब झाला. तेव्हा सर्वप्रथम त्यांनी हात जोडून क्षमा मागितली.
‘जेएनयू’विषयी लक्षात आलेली सूत्रे
१. ‘जेएनयू’चा परिसर अतिशय निर्जन ठिकाणी आहे.
२. तेथील छात्रालयाची नावे चंद्रभागा, सतलज, गोदावरी अशी आहेत.
३. संस्कृत विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सात्त्विक आणि सुसंस्कारित वाटले.
४. संस्कृत विभागाची इमारत स्वस्तिकच्या आकाराची आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात