जगभरात हिंदू असुरक्षित ! भारतातील हिंदूंसाठी केंद्र सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काही करत नाहीत, तेथे श्रीलंकेतील हिंदूंना साहाय्य करण्यासाठी त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोलंबो (श्रीलंका) – श्री कोनेश्वरम् मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख श्री. अरुल सुब्रह्मण्यम् यांचा श्रीलंका सरकारकडून छळ केला जात आहे. श्री कोनेश्वरम् मंदिर हे श्रीलंकेतील प्राचीन हिंदु मंदिर असून या पवित्र मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य करून स्वत:चे धर्मकर्तव्य पार पाडणार्या श्री. सुब्रह्मण्यम् यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. पुरातन वस्तू जतन करण्याच्या नावाखाली श्रीलंकेच्या त्रिंकोमाली जिल्ह्यात हिंदूंचा छळ चालू आहे. श्रीलंका सरकारकडून बौद्ध धर्माला प्राधान्य दिले जाते, तर हिंदूंचा धार्मिक अधिकार हिरावून घेतला जात आहे. श्रीलंका सरकारच्या या कृतीचा शिवसेनेने निषेध केला आहे. श्रीलंकेमध्ये हिंदु समुदाय सुरक्षित जीवन जगू शकत नाही, असे शिवसेनेचे मरावनपुलावू के. सचितानंथन यांनी सांगितले. (शिवसेनाच नेहमी हिंदूंसाठी कृतीशील प्रयत्न करत असते. त्यामुळे हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात