म्हापसा : म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील नदीच्या बाजूला तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा अज्ञातांनी उघड्यावर ठेवल्या होत्या. या प्रतिमा विखुरलेल्या स्थितीत होत्या. हा देवतांचा अपमान आहे. धर्महानी रोखणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे, हे जाणून स्थानिक धर्माभिमानी नागरिकांनी एकत्र जमून हिंदु देवतांच्या प्रतिमांचे योग्यरित्या पुनर्विसर्जन केलेे. हिंदु जनजागृती समितीने या कार्यात पुढाकार घेतला. गोमंतक मंदिर आणि धार्मिक महासंघ, स्वराज्य, रणरागिणी, सनातन संस्था, पद्मनाभ संप्रदाय, स्वयंसाहाय्य गट, गिरी गावचे सरपंच फोंडू नाईक आणि ग्रामस्थ यांसह अनेक हिंदूंनी या कार्यात सहभाग घेतला.
पद्मनाभ संप्रदायाचे आनंद पार्सेकर यांनी या वेळी देवतांच्या चरणी क्षमायाचना केली आणि गार्हाणे घातले. या ठिकाणी देवतांच्या प्रतिमा रस्त्यावर फेकून अवमान करू नये, असा फलक लावू, असे गिरी गावचे सरपंच श्री. फोंडू नाईक यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात