Menu Close

शिवाजी विद्यापिठाच्या नामांतरणाच्या हिंदु जनजागृती समितीच्या विषयावर ब्राह्मण सभेचा पाठिंबा – केदार खाडिलकर

सांगली :  अस्मिता रक्षणाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करण्यासाठी चालू केलेली मोहीम अत्यंत स्तुत्य असून या मोहिमेला ब्राह्मण सभा सांगली आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने मी पाठिंबा घोषित करत आहे, अशी माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांनी दैनिक सनातन प्रभातशी बोलतांना सांगितले. वास्तविक हे नामकरण होतांनाच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे होणे अपेक्षित होते, तसे ते झाले नाही, हे दुर्दैव आहे.

जातीभेद निर्माण करून राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस जनतेची दिशाभूल करणार ?

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दाते पंचांगाची होळी केली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणतीच सूत्रे नसल्याने ते जातीभेद निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जनताही अशा लोकांना आता ओळखून असून ती अशांना आता भीक घालणार नाही, असे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. केदार खाडिलकर या वेळी म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *