कुंभारवाडा (कर्नाटक) येथे धर्मजागृती सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
कुंभारवाडा (कर्नाटक) – सध्याची समाजविघातक परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही. भ्रष्टाचाराने सर्वच क्षेत्रांमध्ये परिसीमा गाठली आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना भ्रष्टाचार, आतंकवाद आदी निपटणे शक्य नाही. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज, चाणक्य, हरिहर बुक्कराय आदींकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. वेंकटरामन नाईक यांनी येथील क्षेत्रपाल देवस्थान सभामंडपामध्ये हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत केले. या सभेला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेला सनातन संस्थेच्या कु. नागमणी आचार्य आणि रणरागिणी शाखेच्या सौ. विदुला हळदीपूर यांनीही मार्गदर्शन केले. या धर्मसभेला हिंदु संघटनांचे ३०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अपरिहार्य ! – सौ. विदुला हळदीपूर
हिंदूंसाठी केवळ काश्मीरच नव्हे, तर देशातील अन्य काही प्रदेशातही समस्या निर्माण झाल्या आहेत. तेथून हिंदूंना पलायन करावे लागत असल्यामुळे ते बेघर झाले आहेत. आज महिला आणि पुरुष दोघांनाही स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अपरिहार्य आहे.
कु. नागमणी आचार्य यांनी धर्मशिक्षणानेच समाजात सकारात्मक पालट होऊ शकतात, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. येेथून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोडाथल्ली येथील एक धमप्रेमी सभेसाठी आले होते. सभा संपल्यानंतर आवरण्याच्या सेवेत ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सदस्याने अशा प्रकारची सभा त्यांच्या गावातही आयोजित करण्याची समितीला विनंती केली.
३. कुंभारवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. मंगेश कामत सभा संपेपर्यंत उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात