सातारा : आतापर्यंत आपण जीवनामध्ये अनेक संघर्षांना तोंड देत आलो आहे. काळानुरूप परिस्थिती पालटत असून महिलांचे जीवन दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. आपल्याला वाटत असेल की, पोलीस महिलांचे संरक्षण करतील, मग मी कशाला चिंता करू ? परंतु भगिनींनो, तुम्हीच विचार करा, निर्भया प्रकरण असो किंवा कोपर्डी घटना असो, आता आपले रक्षण आपल्यालाच करायचे आहे, हे निश्चित. यासाठीच येणार्या कठीण काळात हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणार असून स्वसंरक्षणासह राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी युवतींना, माता-भगिनींना सिद्ध करणार आहे. रणरागिणी शाखेच्या या उपक्रमात अधिकाधिक युवतींनी सहभागी व्हावे, असे सौ. रूपा महाडिक यांनी येथे सांगितले. हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने देगावरोड येथील चंदननगर या भागात झालेल्या प्रवचनात त्या बोलत होत्या.
स्त्रियांमध्ये शौय आणि धैर्य अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रणरागिणी कार्यरत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. माधुरी फडके यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात