याचाच अर्थ राज्य सरकारने या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य प्रदान केले होते ! गोवा सरकारची करमणूक करामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाचा किती कर बुडवला, याचे आकडे सरकारने घोषित केले पाहिजेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे – गोव्यात घेतलेल्या कार्यक्रमात काही अडचणी आल्यामुळे यावर्षी आम्ही कार्यक्रम पुण्यात घेतला. त्यात प्रारंभी काही अडचणी आल्या; मात्र जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला, असे प्रतिपादन पुण्याजवळील केसनंद गावात २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजक आणि परसेप्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हरिंदर सिंह यांनी केले आहे.
एका मुलाखतीत ते बोलत होते. हरिंदर सिंह पुढे म्हणाले, सनबर्न हा प्रकार नेहमीच्या इलेक्ट्रॉनिक नाच-गाण्याच्या कार्यक्रमाची पुढील आवृत्ती असून तो लोकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. (कर्कश आवाजातील गाणी, त्यावर नाचणारे लोक, सोबत मद्य, मादक पदार्थाचे सेवन हे प्रकार देशाच्या लोकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग कसे असेल ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात