वारूंजी (तालुका कराड) येथे हिंदु धर्मजागृती सभा
वारूंजी (तालुका कराड) : न्याययंत्रणेच्या आदेशानुसार गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक रात्री १० वाजता बंद केले जातात; परंतु कित्येक वर्षे न्यायालयाचे आदेश मोडूनसुद्धा बेकायदेशीररित्या बांग देणार्या मशिदींवरील भोंगे मात्र काढले जात नाहीत. कायद्याचा बडगा नेहमी हिंदूंवरच उगारून हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे डोस दिले जात आहेत. सर्वधर्मसमभावाच्या या थोतांडामुळे हिंदूंमधील रक्त थंड पडले आहे.
हिंदूंच्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवरायांचे सळसळते रक्त पुन्हा वाहील, तेव्हाच हिंदूंवरील हा अन्याय दूर होईल. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:मध्ये छत्रपती शिवरायांप्रमाणे धर्मनिष्ठ व्हावे आणि हिंदुत्वासाठी कार्य करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे यांनी केले. ते वारूंजी येथे १ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु जनजागृती सभेमध्ये बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “हिंदुबहुल भारतात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण होत आहे. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना सरकार हातदेखील लावत नाही. हिंदूंच्या मंदिरातील पैसा ख्रिस्ती संस्थांना देण्यात येत आहे. सध्याचे शासन काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्याविषयीही निष्क्रीय आहे. हे अन्याय थांबवण्यासाठी संघटिक कृती करणे आवश्यक आहे.”
सभेच्या आरंभी श्री. अनिकेत पाटील यांनी श्री. राहुल कोल्हापुरे यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समितीचे श्री. शुभम वडनगेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा जिल्हा समन्वयक श्री. हणमंत कदम यांनी सांगितला. सभेनंतर उपस्थितांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. तसेच अनेक महिलांनी संक्रांतीचे वाण म्हणून देण्यासाठी ग्रंथांची मागणी केली.
सरपंच श्री. महादेव पाटील यांनी सभेसाठी सभागृह तसेच इतर साहित्य आणि ‘भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था, केसे’चे अध्यक्ष श्री. हरिभाऊ गरूड यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली.
हिंदुजागृतीच्या कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी ४ जानेवारी या दिवशी सिद्धनाथ मंदिर, वारूंजी येथे सायंकाळी ७ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात