नवी देहली : अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर अॅमेझॉनने साइटवरील भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणा-या पायपुसणीची विक्री अखेर थांबवली. कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर अॅमेझॉननं त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली.
‘आमच्या तिरंग्याचा अपमान करणा-या सर्व उत्पादनांना त्वरित हटवा अन्यथा आम्ही अॅमेझॉनच्या अधिका-यांना व्हिसा देणार नाही तसेच सध्या ज्या अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिसा आहे, त्यांचा व्हिसा रद्द करू’, असा इशारा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिला होता.
या संदर्भात हिंदु जनजागृती समिती ने आपल्या वेबसार्इट वर अॅमेझॉन ला पत्र लिहुन राष्ट्रध्वजाचा अपमान करणा-या पायपुसणीची विक्री थांबवण्याची मागणी केली होती. तसेच समिती ने राष्ट्रप्रेमी नागरीकांना अॅमेझॉन चा वैध मार्गाने निषेध करण्याचे आवाहन केले होते.
संदर्भ : लोकमत
अॅमेझॉन संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रूपाच्या पायपोसची विक्री !
नवी देहली : प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळ अॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रूपातील पायपोस विक्रीसाठी ठेवले आहे. तीन रंगातील या पायपोसमुळे भारतियांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. हे उत्पादन अॅमेझॉन कॅनडासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
काही राष्ट्राभिमान्यांनी अॅमेझॉनकडे याची तक्रार केली आहे; मात्र त्यावर अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात