Menu Close

पंतप्रधान मोदी इस्लामविरोधी असल्याचा इसिसचा आरोप

  • मुसलमानांनी मध्यरात्रीही साहाय्यासाठी हाक मारल्यावर त्यासाठी सिद्ध असल्याचे म्हणणारे पंतप्रधान मोदी इस्लामविरोधी कसे ?
  • मदरशांना अनुदान देणारे मोदी इस्लामविरोधी कसे ?
  • सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या मशिदीला भेट देणारे मोदी इस्लामविरोधी कसे ?
  • गोरक्षकांवर टीका करणारे; समान नागरी कायदा, राममंदिर, कलम ३७० आदींविषयी मौन बाळगणारे मोदी इस्लामविरोधी कसे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्तंबूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्लामविरोधी कारवाया करत आहेत, असा आरोप इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने केला आहे. इसिसने प्रसारित केलेल्या १९ मिनिटांच्या एका ध्वनीचित्रफीतीत हा आरोप करण्यात आला आहे. यात इस्लामविरोधात कोणकोणते नेते काम करत आहेत, याची नावे दिली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याव्यतिरिक्त व्लादिमीर पुतीन, बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप इर्डोगन हे देखील इस्लामविरोधी असल्याचे आयसिसने म्हटले आहे. इस्तंबूलमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या आक्रमणाचे दायित्वही इसिसने स्वीकारल्याचे यात म्हटले आहे. या आक्रमणात ४७ जण ठार झाले होते.

स्तोत्र : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *