आेंकारेश्वर : येथील मार्कंडेय आश्रमाचे प्रमुख स्वामी प्रणवानंदजी महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांनी ४ जानेवारीला नर्मदातटावरील मार्कंडेय आश्रमात भेट घेतली. या वेळी पू. डॉ. पिंगळे यांनी त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची विस्तृत माहिती देऊन या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांना सनातन-निर्मित विविध विषयांवरील ग्रंथसंपदेचीही माहिती देण्यात आली.
या वेळी स्वामी प्रणवानंदजी म्हणाले की, धर्माचरण करण्याविषयी आम्हीही आश्रमात येणार्या लोकांना सांगत असतो; पण बाह्यपरिस्थितीत पाश्चात्त्यांचा इतका पगडा आहे की, त्या वातावरणात लोक पुन्हा धर्माचरण सोडून देतात. यासाठी लोकांना एकदा सांगून होणार नाही. वारंवार त्यांच्या संपर्कात रहायला हवे. आपले ग्रंथ आणि सत्संग यातून हे साध्य होईल.
या वेळी मार्कंडेय आश्रमात स्वामी ज्ञानप्रसूनेंद्र सरस्वती तथा मत्तूर स्वामीजी यांचीही पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक असलेले स्वामीजी विरक्तवृत्तीने सतत भ्रमण करत असतात. आपला अधिकाधिक वेळ ते ज्ञानसाधना आणि उपासनेत व्यतीत करतात. यावेळी पू. मत्तूर स्वामीजी म्हणाले की, ईश्वराची योजना आहे. तो प्रत्येकाकडून कार्य करवून घेत आहे. तुम्ही समाजात जाऊन जागृती करत आहात, हे चांगले आहे. जेवढे आपला धर्मानुसार आचरण वाढेल, तेवढा त्याचा समाजावर प्रभाव पडेल.
0 Comments