न्यूजर्सी : अमेरिकेतील कलाकार जेने विल्सन यांनी निर्माण केलेल्या अनेक उत्पादनांवर हिंदूंचे ॐ हे पवित्र धार्मिक चिन्ह छापून ती उत्पादने सोसायटी ६ या संकेतस्थळावर विक्रीस ठेवून ॐ चे विडंबन केले आहे, अशा आशयाच्या तक्रारी अमेरिकेतील अनेक धर्माभिमान्यांनी तेथील फोरम फॉर हिंदु अवेकनिंग (एफ्.एच्.ए.) या हिंदुत्ववादी संघटनेकडे नोंदवल्या होत्या. एफ्.एच्.ए.ने त्वरित सोसायटी ६ या आस्थापनास तसेच जेने विल्सन यांना पत्र पाठवून निषेध नोंदवला आणि ही उत्पादने संकेतस्थळावरून काढून टाकण्याची मागणी केली. या पवित्र चिन्हाचा कपडे आणि इतर साहित्यावर वापर केल्यामुळे जगातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे ही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत सोसायटी ६ तसेच जेने विल्सन यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
धर्माभिमानी खालील ई-मेल पत्यांवर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
१. [email protected]
२. [email protected]
३. [email protected]
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात