Menu Close

दुबईहून ५ किलो सोने घेऊन येणाऱ्या धर्मांधाला मुंबई विमानतळावर अटक

नवी देहली : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवैधरित्या ४.९ किलो सोने घेऊन जाणाऱ्या एका २६ वर्षीय युवकाला महसूल गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले. या सोन्याचे बाजारभावानुसार १.२९ कोटी रूपये इतके मूल्य आहे. कबादशा मोहम्मद फवाज असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून तो दुबईहून सोन्याची ४२ बिस्किटे घेऊन भारतात आला होता. बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास फवाज हा दुबईवरून आलेल्या विमानातून मुंबईत उतरला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रामेश्वरम येथे एका व्यक्तीकडून सुमारे २.३० कोटी किमतीचे ८.३ किलो सोन्याची बिस्किटे जप्त केले होते. ही व्यक्ती श्रीलंकेहून सोन्याची बिस्किटे घेऊन येत होती. मदुराई आणि तुतीकोरिन येथील गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना एक व्यक्ती कारमधून सोने घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मदुराई-रामेश्वरम महामार्गावर रामेश्वरपासून ४० किलोमीटर दूर अंतरावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी ३१ वर्षीय मुजीबूर रेहमान याला अटक केली. तो एर्नाकूलमजवळील उचीपुली येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सोन्यासह कारही जप्त केली असून पुढील तपास केला जात आहे.

संदर्भ: लोकसत्ता

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *