हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कुठेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री न होण्यासाठी सर्व विक्रेत्यांना सूचना देऊ, तसेच प्रजासत्ताक दिन झाल्यावर आमचे स्वच्छता निरीक्षक सर्व रस्त्यांवरून फेरी मारून ध्वज पडलेले दिसल्यास ते गोळाही करतील, असे आश्वासन सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आंबोळे यांनी दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने काळजी घेण्यात यावी यांसाठी निवेदन देण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर लिखाण प्रसिद्ध करू ! – उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या शाळांना माहिती होण्यासाठी जिल्हा परिषदेचे एक संकेतस्थळ आहे. त्यावर हिंदु जनजागृती समितीचे निवेदन प्रसिद्ध करू, तसेच सर्व मुख्याध्यापकांनाही सूचना देऊ, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) एम्.एस्. धोत्रे यांनी दिले. हेच निवेदन जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग आणि सांगली जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले. या वेळी सर्वश्री दत्तात्रय रेठरेकर, चंद्रशेखर पट्टणशेट्टी आणि दत्तात्रय कुलकर्णी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात