नवी देहली : बांगलादेशची राजधानी ढाकामधील कॅफेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पोलीस चकमकीत ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एएफपी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
ढाकामधील गुलशन या आलिशान कॅफेवर १ जुलै २०१६ रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वात भ्याड दहशतवादी हल्ला होता.
नेरुल इस्लाम मर्झान असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून सोबत आणखी एका संशयित दहशतवादीही मारला गेला आहे. दहशतवादी मर्झानचे वय जवळपास ३० असून तो ढाका कॅफे हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक होता, अशी माहिती समोर आली आहे.
संदर्भ : लोकमत