Menu Close

शुल्क न भरणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेने वर्गात डांबले

  • हिंदूंनो, आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे कि नाही, ते वेळीच ठरवा !

  • गुन्हा प्रविष्ट करण्यास खांदेश्‍वर पोलिसांची टाळाटाळ

पनवेल : येथील सेंट जोसेफ हायस्कूलमधील इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणार्‍या हिंदु विद्यार्थिनीने शुल्क न भरल्याने तिला एका वर्गात डांबून ठेवण्यात आले. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली; खांदेश्‍वर पोलिसांनी केवळ पालकांना अर्ज देण्यास सांगून गुन्हा प्रविष्ट करण्यात टाळाटाळ केली. (हिंदूंनो, कारवाईत टाळाटाळ करणार्‍या पोलिसांची वरिष्ठांकडे तक्रार करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयात जाण्यास सांगितले; पण त्या विद्यार्थिनीला वर्गातच बसण्यास सांगितले. तिला बाहेरून कडी लावली आणि वर्गातील दिवे-पंखेही बंद केले. याप्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाला विचारल्यावर त्यांनी वरून आदेश असल्याचे सांगून विषय टाळला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *