शिक्षकानेच विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला कठोर शासन व्हावे यासाठी आज निपाणीत मुक मोर्चा काढण्यात आला. निपाणीच्या नागरिकांनी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभाग घेतल्याने निपाणीच्या इतिहासातील हा एक मोठा मोर्चा ठरला. सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी या घटनेबदलची चीड व्यक्त केली.
अन्वरहुसेन हजरतअली नदाफ (वय ३०) व त्याची पत्नी रुक्साना (वय २८, मूळ गाव नरगूंद, ता. गोकाक, सध्या रा. निपाणी) या दोघांनी संगनमताने शाळकरी मुलीवर अत्याचार करून त्याचे चित्रिकरण केले होते. या प्रकरणाचा उलघडा होताच निपाणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी विविध संघटना, शहरातील शाळा, नेते, सर्व राजकीय पक्ष यांच्यावतीने मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सकाळी ११ च्या सुमारास श्रीराम मंदिर येथून मुक मोर्चाला सुरुवात झाली. राम मंदिर, नगरपालिका, अशोक नगर, चन्नमा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, महादेव मंदिर, गांधी चौक, नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जोशी गल्ली, नाथ पै सर्कल, बेळगाव नाका या मार्गाने अतिशय शांततेत मोर्चा काढून तहसील कार्यालयाजवळ त्याची सांगता करण्यात आली. यावेळी विशेष तहसीलदार संजीव कांबळे यांना लहान मुलींनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निपाणीत ऐतिहासिक ठरलेल्या या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये अन्यायाविरुद्धची चीड दिसून आली. लोकांनी हातावर काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध केला. शहर व उपनगरातील कॉलेज, शाळा यांच्या विद्यार्थी व शिक्षकांनी या मोर्चात सहभागी होत अन्यान सहन करणार नसल्याचेच दाखवून दिले.
संदर्भ : पुढारी
८ जानेवारी २०१७
निपाणी : विद्यार्थीनीवर धर्मांध शिक्षकाकडून बलात्कार
निपाणीतील रामनगर भागात एका धर्मांध शिक्षकाने विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या सहा महिन्यापासून सुरू असणाऱ्या या प्रकरणात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याची तक्रार मुलीने पोलिसात दिली आहे. यावरून निपाणी पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली आहे. अन्वर हुसेन हजरतअली नदाफ (वय ३०) व त्याची पत्नी रूकसाना नदाफ अशी त्यांची नावे आहेत.
आरोपी शिक्षक ज्या शाळेत कार्यरत होता, त्याच शाळेत पीडित मुलगी १० वीत शिक्षण घेते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरची परिस्थिती गरीब असल्याचा अपलाभ घेऊन या शिक्षकाने या मुलीला शिक्षणासाठी घरी ठेवून घेतले होते. मात्र, तिच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन गेल्या सहा महिन्यापासून या अन्वरने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अखेर या त्रासाला कंटाळून मुलीने शाळा प्रशासनाच्या सहायाने पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी शिक्षक व त्याच्या पत्नीला अटक केली. या दोघांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी श्रीराम सेना, धनगर समाज व अन्य सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाकडे निवेदनाव्दारे केली आहे.
संदर्भ : पुढारी