नालासोपारा : प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करावा. एकाग्रतेने अभ्यास होण्यासाठी नामजप करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. दीप्तेश पाटील यांनी केले. येथील संतोष भवन येथील भगवान श्री राम अवधूत विद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. दीप्तेश पाटील यांनी अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी, स्वत:मध्ये गुणांची वृद्धी कशी करावी, याविषयीही सांगितले. १३० विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या वेळी श्री. दीप्तेश पाटील म्हणाले, निराशावादी विचार मनात आणून आत्महत्या करणे उचित नाही. प्रत्येक युवकाने स्वत:च्या पालकांचा विचार करावा. आज आपल्याला शिकवले जाते की, सर्व शोध हे पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी लावले आहेत; मात्र तसे नसून याच संस्कृतीतील महान ऋषीमुनींनी जगातील सर्वांत महत्त्वाचे शोध लावले आहेत, हे लक्षात घ्यावे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात