मुंबई : अमेरिकेतील प्रेमा डिझाइन्स या ऑनलाइन कपडे विक्री करणार्या आस्थापनाने त्यांच्या पायापासून कमरेपर्यंत घालण्यात येणार्या लेगिंग्ज या वस्त्रांवर श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे छापून विडंबन केले आहे.
ही गोष्ट अनेक धर्माभिमान्यांच्या लक्षात येताच त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी कळवले. समितीने त्वरित प्रेमा डिझाइन्स आस्थापनास पत्र लिहून ही उत्पादने विक्रीतून काढून टाकण्याची विनंती केली. हे विडंबन केवळ धर्माविरोधीच नसून त्यामुळे हिंदूच्या देवतांचे महत्त्व इतरांच्या दृष्टीने न्यून होते.
तसेच अशी वस्त्रे एकदा जुनी झाली, तर ती फेकून देण्यात येतात आणि अशा रीतीने देवतांचा अवमान होतो, असे पत्रात म्हटले आहे. समितीच्या या पत्रास प्रेमा डिझाइन्स आस्थापनाने प्रतिसाद दिलेला नाही.
यामुळे धर्माभिमानी [email protected] या इ-मेलवर निषेध नोंदवत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात