Menu Close

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदूंवर होणारा अन्याय रोखण्यासाठी सज्ज व्हा ! – श्री. हणमंत कदम, हिंदु जनजागृती समिती

जकातवाडी (जिल्हा सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा

ssat_01_colजकातवाडी (जिल्हा सातारा) : भारतातील काश्मिरी बांधवांचे २६ वर्षांनंतरही पुनर्वसन झालेले नाही. हिंदूंची सहस्रो मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत; परंतु मशिदी आणि चर्च यांचे नियंत्रण करणार्‍या वक्फ बोर्ड आणि डायासेशन सोसायटी यांना सरकार हातही लावत नाही. हिंदूंनी मंदिरात दान केलेले पैसे अन्य धर्मियांवर सवलतींची खैरात करण्यासाठी उधळले जात आहेत. हज यात्रेला अनुदान देण्यात येते; परंतु हिंदूंच्या अमरनाथ आणि मानससरोवर यात्रांवर मात्र कर आकारला जातो. हा बेगडी सर्वधर्मसमभावच हिंदूंच्या जिवावर उठला आहे. हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हणमंत कदम यांनी केले. ते ६ जानेवारीला जकातवाडी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी उपस्थित हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सज्ज असल्याचे सांगत संघटित प्रयत्न करण्याचा निश्‍चय केला.

श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला प्रारंभ झाला. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हणमंत कदम यांचा सत्कार तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. जनार्दन भोसले यांनी केला. रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांचा सत्कार सरपंच सौ. सीता जाधव यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा समितीचे श्री. वैभव क्षीरसागर यांनी सांगितला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. सभेला १५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

धर्मांध आणि भ्रष्ट प्रवृत्तीला रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. रूपा महाडिक, रणरागिणी शाखा

हिंदु युवतींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लव्ह जिहाद, इसिसचे धर्मांध जिहादी, भ्रष्ट अधिकारी यांनी देश पोखरला आहे. यावर मात करण्यासाठी हिंदु युवतींनी सज्ज झाले पाहिजे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा यांच्याप्रमाणे धर्माचरण करून बलवान व्हायचे आहे.

सध्याच्या असुरक्षित काळात प्रत्येकीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. हिंदूंच्या समस्या कायसस्वरूपी सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच कायमस्वरूपी तोडगा आहे.

सहकार्य

नवजवान सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ध्वनीक्षेपक यंत्रणा, प्रकाशव्यवस्था आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. श्री. एकनाथ पवार यांनी रिक्शातून उद्घोषणा करून सभेचा प्रसार केला. सभेस श्री. जनार्दन भोसले यांचे सहकार्य लाभले. श्री. विठ्ठल जगताप यांनी सभेचे आयोजन आणि प्रसारकार्य या सेवांमध्ये सहभाग घेतला. तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये अशा सभा घेण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (असे कृतीशील धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *