Menu Close

देशद्रोह्यांचे उदात्तीकरण करणारा ‘रईस’ आणि हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत !

जळगाव आणि भुसावळ येथील हिंदुत्वनिष्ठांची निवेदनाद्वारे मागणी

राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कृतीशील होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

मेट्रो चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

जळगाव : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचा, तसेच एका माफियाचे उदात्तीकरण करणारा ‘रईस’ आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ हे दोन्ही चित्रपट जानेवारी २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहेत. राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात असणारे हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांनी एका निवेदनाद्वारे केली. जळगाव शहरातील प्रमुख अशा राजकमल, अशोक, नटवर, रिगल, मेट्रो आणि आयनॉक्स या ६ चित्रपटगृह कर्मचार्‍यांना हे निवेदन देण्यात आले.

भुसावळ येथेही तहसीलदार आणि वसंत अन् पांडुरंग या चित्रपटगृहाच्या कर्मचार्‍यांना निवेदन देण्यात आले. भुसावळ येथे तहसीलदारांना निवेदन देतांना शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांत पाटील उपस्थित होते. जळगाव आणि भुसावळ येथे निवेदन देतांना बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद, छावा क्रांती सेना, युवा सेना, शिवप्रतिष्ठान, स्वराज्य प्रतिष्ठान, अखिल भारतीय क्षत्रिय समाज, राष्ट्रीय स्वयंसावक संघ आदी संघटनांचे, तसेच अन्य धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते.

या निवेदनात म्हटले आहे . . .

१. ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटात भगवान शिव, तसेच पवित्र तीर्थक्षेत्र काशी यांचा अवमान करण्यात आला आहे. हिंदूंची तीर्थक्षेत्रे, साधू-संत आदी श्रद्धास्थानांविषयी या चित्रपटात साकारलेले चुकीचे प्रसंग आणि संवाद यांमुळे हिंदु धर्माविषयी अपसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रसंगांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जाणार आहेत. काशी हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून प्रतिदिन सहस्रोे विदेशी पर्यटक तेथे श्रद्धेने जातात. त्यामुळे जागतिक स्तरावर होणारा हिंदु धर्माचा अवमान रोखला पाहिजे.

२. उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या विरोधातील जनभावना तीव्र झाल्या असतांनाही भारतातीलच काही चित्रपट-निर्माते आर्थिक लाभासाठी पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ‘रईस’सारख्या चित्रपटांची निर्मिती करतात. पाकिस्तान सातत्याने भारतविरोधी कारवाया करत असतांना पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास अनुमती देणे म्हणजे भारतीय जवानांच्या बलीदानाचा अनादर करण्यासारखे होईल आणि हा राष्ट्रद्रोह ठरेल.

३. नुकताच माहिरा खानचा एक ‘व्हिडीओ’ प्रदर्शित झाला असून त्यात तिने ‘पाकिस्तानने भारताकडून प्रेरणा घेण्यासारखे काही नाही’, असे संतापजनक वक्तव्य केले आहे.

४. त्यामुळे रईस’ आणि ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटावर बंदी घालावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *