गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीनतेरा ! यावरून केवळ कायदा करून उपयोग नाही, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासाठी पोलीस यंत्रणाही तितकीच सक्षम हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नगर : ६ जानेवारीला जिल्ह्यातील संगमनेर भारतनगर येथील पशूवधगृहावर धाड टाकून पोलिसांनी ४७ गोवंशियांची सुटका केली, तर ४०० किलो मांस जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून पशूवधगृह चालवणारा धर्मांध नवाज कुरेशी हा पळून गेला. या कारवाईत सोडवण्यात आलेले गोवंश कन्हे घाटातील पांजरपोळ येथे पाठवण्यात आले, तर जप्त करण्यात आलेले मांस नष्ट करण्यात आले आहे. मुंबई येथील पिपल्स फॉर अॅनिमल अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. (पूर्वमाहिती मिळूनही कारवाईत पोलिसांना मुख्य आरोपीला का पकडता आले नाही ? यामुळे पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कारवाईत पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस उपनिरीक्षक छबीलदास गवांडे यांच्यासह सहकारी पोलीस सहभागी होते. या कारवाईमुळे राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही पशूवधगृहांमधून दिवसाढवळ्या गोवंशियांची हत्या होत असल्याचे उघड झाले आहे. (एका संघटनेच्या पदाधिकार्यांना जे निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलीस यंत्रणेला का निदर्शनास येत नाही ? कि ते हप्ते घेऊन अशा अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करतात ? एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेली गोवंशियांची हत्या पोलीस आणि प्रशासन यांना लक्षात येत नसेल, तर जनतेने कर भरून या यंत्रणांना का पोसायचे ? या प्रकरणी संबंधित पोलिसांचीही चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संगमनेर येथे अनधिकृतपणे हे पशूवधगृह चालू होते. पिपल्स फॉर अॅनिमल अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेच्या पदाधिकार्यांनी संगमनेर येथे जाऊन पशूवधगृहाची पाहणी केली. या ठिकाणी होत असलेल्या गोवंशियांच्या हत्येविषयी या संघटनेचे श्री. चेतन शर्मा यांनी याविषयी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांना माहिती दिली. त्यानंतर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे यांना सूचना देऊन ही कारवाई करण्यात आली.
वासरांची हत्या करून मांस मुंबईत विकले जाते ! – चेतन शर्मा, पिपल्स फॉर अॅनिमल अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया
शहरात मोठ्या प्रमाणात गोवंशहत्या होत आहेत. वासरांची हत्या करून मांस मुंबईत विकले जाते. नवाज कुरेशी नावाची व्यक्ती पशूवधगृह चालवत असल्याची माहिती मिळाल्यावर याविषयी चौकशी करून आम्ही पोलिसांना माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात