रामनाथी (गोवा) : हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच येणार्या आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी भृगुसंहितेच्या माध्यमातून श्रीभृगु महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ९ जानेवारी २०१७ या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमात ब्रह्मास्त्रयागाला प्रारंभ झाला. याआधी श्रीभृगु महर्षींच्या आज्ञेने गेले १५ दिवस सनातन आश्रमात ब्रह्मास्त्रमंत्राचा १ लक्ष २५ सहस्र जप करण्यात आला. यागाच्या वेळी या जपाच्या दशांश म्हणजे १२ सहस्र ५०० जप करून हवन करण्यात येणार आहे. यागाचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला, तसेच गणपतिपूजन, पुण्याहवाचन आणि मुख्य देवता श्री बगलाम्बिकादेवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अग्निस्थापना आणि नवग्रहपूजन करण्यात आले. या यागाचे पौरोहित्य सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित करत आहेत. या यागानिमित्त १०, ११ आणि
१२ जानेवारी या दिवशी ब्रह्मास्त्रमंत्र म्हणून हवन करण्यात येणार आहे. १२ जानेवारीला ब्रह्मास्त्रयागाची पूर्णाहूती होईल.
क्षणचित्र
यज्ञकुंडात अग्नीची स्थापना केल्यावर येणारा धूर भूमीपासून विशिष्ट उंचीवर तेथे असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे जात होता. तेव्हा यज्ञ परिसर हा उच्च लोकात आहे, असे यज्ञस्थळी उपस्थित साधकांना जाणवले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात