वाराणसी – पवित्र नगरी काशी आणि भगवान शिव यांचा घोर अनादर करणारा चित्रपट ‘मोहल्ला अस्सी’ आणि पाक कलाकारांची भूमिका असणारा ‘रईस’ हा चित्रपट वाराणसीमध्ये या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांच्या प्रदर्शनाला प्रतिबंध करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती, बनारस बार असोसिएशनचे अधिवक्ता आणि धर्माभिमानी यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन सादर केले. शिष्टमंडळाकडून या वेळी २६ जानेवारीच्या वेळी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठीही निवेदन देण्यात आले.
६ जानेवारीला वाराणसीचे जिल्हाधिकारी योगेश्वर राम मिश्र, वाराणसी जिल्हाआयुक्त रमेश नितिन गोकर्ण आणि पोलीस अधीक्षक (गुन्हे) त्रिभुवन सिंह यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाआयुक्तांनी या संदर्भात पोलीस आणि जिल्हाधिकारी यांना याविषयी माहिती देण्याचा आदेश दिला.
शिष्टमंडळात बनारस बार असोसिएशनचे अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता अरुणकुमार मौर्या, अधिवक्ता विजय सेठ, अधिवक्ता निरज शुक्ला, अधिवक्ता धीरेन्द्र कुमार, अधिवक्ता प्रेमचंद्र श्रीवास्तव, अधिवक्ता कमलेश कुशवाह, अधिवक्ता अनुराग पाण्डेय, अधिवक्ता मदन मोहन पाण्डेय, अधिवक्ता विवेक कुमार पाण्डेय, अधिवक्ता राकेश मिश्रा, धर्माभिमानी श्री. आकाश पाण्डेय, श्री. अमित चौबे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक सहभागी होते.
अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता श्री. संजीवन यादव यांनी सर्वांना संघटित करण्याचे, तसेच प्रसारमाध्यमांना आमंत्रित करण्याचे कार्य केले.
या संदर्भात समितीच्या कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये श्री काशी सुमेरु पीठाधीश्वर स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांची भेट घेतली. स्वामी नरेंद्रानंद सरस्वती म्हणाले, ‘‘मोहल्ला अस्सी’सारख्या चित्रपटांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तसेच पाकला शत्रू राष्ट्र घोषित करून त्याच्याशी सर्वप्रकारचे संबंध आणि व्यवहार बंद केले पाहिजेत.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात