‘महिलांची सुरक्षा’ या विषयावर ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीवर चर्चासत्र !
बेंगळुरू (कर्नाटक) – शहरात महिलांचा विनयभंग होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेला राज्य सरकारच उत्तरदायी आहे. जे सरकार महसूलासाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने होणार्या कार्यक्रमांना रात्री २ वाजेपर्यंत अनुमती देते, तेच सरकार महिलांच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष करते. आज अत्याचार करणार्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयानेही अशा प्रकरणात संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा यांनी केले. ३१ डिसेंबरच्या रात्री बेंगळुरू येथील एम्.जी. मार्गावर काही महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीवर ‘महिलांची सुरक्षा’ या विषयावर नुकतेच चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात कु. गौडा यांच्यासह जनता दल (सेक्यूलर)चे नेते महेंद्र कुमार, अधिवक्त्या प्रमिला नेसरगी, राज्य महिला आयोगाच्या माजी उपाध्यक्षा मंजुळा वासन यांनी सहभाग घेतला.