Menu Close

मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांवर बंदी घाला !

नंदुरबार येथे चित्रपटगृहाच्या मालकांकडे निवेदनाद्वारे मागणी

श्री. दर्शन सोनार यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

नंदुरबार : जानेवारी २०१७ मध्ये प्रसिद्ध होणार असलेल्या श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ आणि पाक कलाकारांचा समावेश असलेल्या ‘रईस’ या चित्रपटांवर बंदी घाला, अशी मागणी येथील धर्माभिमानी हिंदूंकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन अमर चित्रपटगृहाचे मालक गणेश सोनार यांच्या वतीने श्री. दर्शन सोनार यांनी स्वीकारले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, भावना कदम, क्षत्रिय महाराणा प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष श्री. जितेंद्र राजपूत, रा.स.प.चे जिल्हाध्यक्ष मयुर चौधरी, राणा राजपूत सेवा समितीचे चेतन राजपूत, भूषण बागुल, अमोल ठाकरे, आकाश गावित, राजू चौधरी, सचिन भोजने उपस्थित होतेे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *