व्यावसायिक कारणांसाठी गेली अनेक वर्षे हिंदूंच्या देवतांचा वापर करून त्यांचा अवमान केला जात आहे, याविरोधात देशात कायदा करून त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारने करणे अपेक्षित आहे; मात्र तसे केले जात नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : ‘लक्ष्मणस् आर्ट अॅण्ड क्राफ्ट’ या आस्थापनाने त्यांच्या विविध कपडे आणि घरगुती सजावटीच्या वस्तू यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे छापून देवतांचे विडंबन केले आहे. हिंदूच्या देवतांचे विडंबन करणारी ही उत्पादने सदर आस्थापनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. या आस्थापनाच्या बेडशीट, टी-शर्ट, सदरा, बॅग इत्यादी वस्तूंवर श्री गणेश, श्रीकृष्ण आणि श्री लक्ष्मी या हिंदूंच्या देवतांची चित्रे छापण्यात आली आहेत. हिंदूंना वंदनीय असलेल्या हिंदूंच्या देवतांची विटंबना करणार्या या संकेतस्थळाचा धर्माभिमानी हिंदूंनी निषेध केला आहे.
अनेक धर्माभिमानी हिंदूंनी या विडंबनाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडे तक्रार केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदर आस्थापनाचे मालक अभिजित पटेल आणि सौ. सीता पटेल यांची भेट घेऊन देवतांची छायाचित्रे असलेली उत्पादने संकेतस्थळावरून हटवण्याचे आवाहन केले. कपडे आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंवर हिंदूंच्या देवतांची चित्रे छापण्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्याचबरोबर त्यामुळे एक चुकीचा पायंडा घातला जातो. देवतांची चित्रे असलेले कपडे खराब झाल्यानंतर ते फेकून दिले जातात. त्यामुळे देवतांच्या चित्रांची विटंबना होते, हे समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले; मात्र सदर आस्थापनाकडून याविषयी कुठलाच सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
+91-8808661161 / +91-8527169909 / अभिजित +91- 9792041225
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात