बडोदा – २६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस राष्ट्रध्वजजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बडोद्याचे जिल्हाधिकारी लोचन सेहरा आणि जिल्हा शिक्षणाधिकारी एम्.एल्. रत्नू यांना निवेदन देण्यात आले. समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करतांना सेहरा यांनी ‘तुम्ही नेहमी चांगले उपक्रम घेऊन येता,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत सनातनच्या हिंदी धर्माशिक्षण फलक ग्रंथाची मागणी केली. एम्.एल्. रत्नू यांनी सुद्धा ‘समितीचा उपक्रम चांगला आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत समितीच्या मागणीनुसार परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व शाळांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीच्या सूचना प्रसारित केल्या.
या प्रसंगी सनातन संस्थेच्या सौ. मनीषा गोडबोले आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अंशू संत अन् श्री. वैभव आफळे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात