कोल्हापूर : बंगाल, आसाम, केरळ या सीमावर्ती भागांतील हिंदु समाजावर जाणीवपूर्वक दहशत माजवून विस्थापित करण्यामागील कारस्थानाची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्राचा शोध घ्यावा. पश्चिम बंगालमधील दंगलीचे प्रसंग पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी केंद्र शासनाने उपाययोजनांचा विचार करावा यांसह आदी मागण्यांचे निवेदन ९ जानेवारी या दिवशी बजरंग दलाच्या वतीने राष्ट्रपती आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष आकाश नवरूखे, हिंदू एकता आंदोलनाचे चंद्रकांत बराले, वन्दे मातरम् संघटनेचे अवधूत भाट्ये, विहिंपचे अशोक रामचंदानी, रा.स्व. संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समितीचे सुधाकर सुतार, सर्वश्री राजू सूर्यवंशी, सुधीर सूर्यवंशी, रिंकू सोनार, निखिल माळकर, कृष्णा मेरवाडे, राज आजुर्नेकर, दिलीप म्हैतर, भिकाजी भोसले, नामदेव पाटील आदी धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात