स्ट्रॉसबर्ग : युरोपियन मानवाधिकार न्यायालयाने एक ऐतिहासीक निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे स्विझर्लंडच्या शाळेतील मुस्लिम मुलींना मुलांसोबतच पोहोण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
स्विझर्लंडच्या एका मुस्लिम दाम्पत्याने युरोपियन न्यायालयात मुस्लिम मुलींनी मुलांसोबत पोहोण्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मुलांसोबत पोहोल्याने धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन होते असे तक्रारीत म्हटले होते. मात्र, न्यायालयाने याविरोधात निर्णय देत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य ठरवला. याशिवाय न्यायलयाने याचिकाकर्त्यांना जवळपास ९४ हजार रूपयांचा दंडही ठोठावला तसेच मुलींना पोहोण्याच्या प्रशिक्षण केंद्रात पाठवण्याचे आदेशही दिले.
स्विझर्लंडमध्ये बासर आणि अन्य अनेक शहरांत विद्यार्थ्यांनी पोहोणे शिकणे अनिवार्य आहे. ज्या मुली वयाने सज्ञान आहेत त्याच मुलींना यामधून सूट मिळू शकते असे येथील शिक्षण अधिका-यांनी याविषयावर सांगितले. स्विझर्लंड आपली परंपरा आणि गरजेनुसार अभ्यासक्रम ठरवण्यास स्वतंत्र आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.
संदर्भ : लोकमत