Menu Close

समितीच्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करू ! – तहसीलदार

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !

तहसीलदार श्रीमती सविता लष्करे (डावीकडे बसलेल्या) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची  होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ते प्रयत्न व्हावेत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्रीमती सविता लष्करे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर समितीच्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करू, असे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री गजानन पाटील, चंद्रशेखर खांडेकर, ऋषीकेश खांडेकर, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री शंभूराजे पाटील, स्वप्नील माळी, भरत पाटील, सतीश इदाते, सनातन संस्थेचे श्री. सुरेश जाधव आणि श्री. उत्तम मोरे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार उपस्थित होते.

शिराळा येथे विविध ठिकाणी निवेदने

शिराळा : राष्ट्रध्वजाच्या विषयाच्या संदर्भात शिराळा येथे पोलीस उपनिरीक्षक दिलीप वाईकर, नायब तहसीलदार कृष्णा नाईक, गटशिक्षणाधिकारी, तसेच तीन शाळा आणि तीन महाविद्यालये आणि एक वाचनालय येथे निवेदने देण्यात आली. या वेळी हिंदु धर्माभिमानी श्री. अशोक मस्कर, तसेच सर्वश्री राजाराम मोरे, संतोष कुंभार उपस्थित होते.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *